मला दुरचित्रवाहिनी काढण्याची इच्छा निर्माण झाली आहे. काहिही जबाबदारी नाही आणि प्रचंड उपद्रवी मुल्य ! अगदी ग्राम्य भाषेत सांगायचं जर झालं तर शेंबुड पुसता न येणारी पोरं पोरीं रिपोर्टर म्हणुन घ्यायची स्वत:च्या ५-७ वर्षाच्या प्रचंड अनुभवावर घटनांचे विश्लेषण करायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गळ्याच्या शिरा ताणुन फुटेस्तोवर बोलायचं !! किती सोप्पं आहे. शेवटी कसं आहे ना, तथाकथित नालायक भ्रष्टाचारी वगैरे राजकारण्याना शिव्या द्यायच्या वगैरे ठिक आहे. जोपर्यंत राजकारणी लोक अनेक लोकांची उदरनिर्वाहाची सोय करतात (कितीही नाकारले तरी हे खर आहे ) आणि जोपर्यंत प्रॉव्हिडंट फंडाची चिंता करण्यात ज्यांचं आयुष्य जातं ते पोटभरु रिपोर्टर त्याला समांतर असा पर्याय देत नाहीत तोपर्यंत हे असेच चालेल . किंबहुना मला तर हल्ली त्यात काहीही गैर वाटेनासे झालंय. स्वत:मध्ये काही करायची धमक नाही आणी जो माणुस काही हातपाय हलवतोय त्याला अडच्णि करायच्या . मला ख्रिस्तची ति गोष्ट आठवते ज्याम्ध्ये एका पापी स्त्रीला शिक्षा द्यायची असते आणि मग तो लोकाना आवाहन करतो कि ज्यानी पाप केलेले नाही त्यानिच शिक्षा द्यावी . कोणिच पुढे येत नाही. भ्रष्टाचाराचेही तसेच आहे ! भ्रष्टाचार म्हणजे केवळ पैसा खाणे नव्हे . भ्रष्ट असा आचार जो सर्वानी कधी ना कधी कळत वा नकळत केलेलाच असतो . शेवटी राजा कालस्य कारणम असे असले तरी राजा हा आपल्यातलाच असतो. आणि ते काही लोकंच खराब आहेत हे विचार आपल्या सर्वांची दांभिकता आहे. आपणही कधी ना कधी सिग्नल तोडलेला असतो,१० ग्रेम का होइना आपण खोटे बोललेलो असतो. बिचारे राजकारणी सॉफ्ट टार्गेट आहेत. खरं हे आहे की आपण पण चोर आहोत .तेव्हा गाइज कूल डाउन !! जैसे थे !
.... का कुणास ठाउक मला ' बद्रिकेदार ' हे नाव फारच प्रभावित करते. त्या नावामधे एक भारदस्त सौंदर्य आहे असे मला वाटते. " नावात काय आहे " असे जरी शेक्सपिअर म्हणून गेला असला आणि त्या वाक्याखाली स्वत:चे नाव लिहुन गेला असला तरी नाव माणसाला अस्तित्वाच्या जाणिवेबरोबरच बरेच काही देते असे मला वाटते.... हा ब्लॉग त्या सर्वशक्तीमान अशा " बद्रिकेदारार्पणमस्तु"
Tuesday, October 23, 2012
भ्रष्टाचार , टी.व्ही ,आपण आणि जैसे थे !!!
मला दुरचित्रवाहिनी काढण्याची इच्छा निर्माण झाली आहे. काहिही जबाबदारी नाही आणि प्रचंड उपद्रवी मुल्य ! अगदी ग्राम्य भाषेत सांगायचं जर झालं तर शेंबुड पुसता न येणारी पोरं पोरीं रिपोर्टर म्हणुन घ्यायची स्वत:च्या ५-७ वर्षाच्या प्रचंड अनुभवावर घटनांचे विश्लेषण करायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गळ्याच्या शिरा ताणुन फुटेस्तोवर बोलायचं !! किती सोप्पं आहे. शेवटी कसं आहे ना, तथाकथित नालायक भ्रष्टाचारी वगैरे राजकारण्याना शिव्या द्यायच्या वगैरे ठिक आहे. जोपर्यंत राजकारणी लोक अनेक लोकांची उदरनिर्वाहाची सोय करतात (कितीही नाकारले तरी हे खर आहे ) आणि जोपर्यंत प्रॉव्हिडंट फंडाची चिंता करण्यात ज्यांचं आयुष्य जातं ते पोटभरु रिपोर्टर त्याला समांतर असा पर्याय देत नाहीत तोपर्यंत हे असेच चालेल . किंबहुना मला तर हल्ली त्यात काहीही गैर वाटेनासे झालंय. स्वत:मध्ये काही करायची धमक नाही आणी जो माणुस काही हातपाय हलवतोय त्याला अडच्णि करायच्या . मला ख्रिस्तची ति गोष्ट आठवते ज्याम्ध्ये एका पापी स्त्रीला शिक्षा द्यायची असते आणि मग तो लोकाना आवाहन करतो कि ज्यानी पाप केलेले नाही त्यानिच शिक्षा द्यावी . कोणिच पुढे येत नाही. भ्रष्टाचाराचेही तसेच आहे ! भ्रष्टाचार म्हणजे केवळ पैसा खाणे नव्हे . भ्रष्ट असा आचार जो सर्वानी कधी ना कधी कळत वा नकळत केलेलाच असतो . शेवटी राजा कालस्य कारणम असे असले तरी राजा हा आपल्यातलाच असतो. आणि ते काही लोकंच खराब आहेत हे विचार आपल्या सर्वांची दांभिकता आहे. आपणही कधी ना कधी सिग्नल तोडलेला असतो,१० ग्रेम का होइना आपण खोटे बोललेलो असतो. बिचारे राजकारणी सॉफ्ट टार्गेट आहेत. खरं हे आहे की आपण पण चोर आहोत .तेव्हा गाइज कूल डाउन !! जैसे थे !
Sunday, October 21, 2012
दिसामाजी काहीतरी टाइपावे
मला पु ल देशपांडे यांचं एक वाक्य फ़ार आवडतं "मला भावलेलं एक गुज सांगतो. आयुष्यात पोटापाण्यासाठी ती कला अवश्य जोपासा पण त्याच बरोबर संगीत ,शिल्पकला, चित्रकला ,गायन यापैकी ही कुठल्यातरी कलेशी ही मैत्री करा. पहिली कला जगावयास मदत करेल आणि दुसरी कला का जगायच ते सांगेल .
वाचन ही सुध्दा कला आहे अशी म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे का असा प्रश्न मला उगाच आपला विचारवंतासारखा पडतो आणि मग मी जाउन एखादे पुस्तक विकत घेतो. संग्रहामधल्या एकूण पुस्तकांमध्ये न वाचलेल्या /अर्धा वाचलेल्या पुस्तकांची संख्या हि संपुर्ण वाचलेल्या पुस्तकांच्या संख्येपेक्षा जास्त असावी :-)
पण हल्ली मी ठरवलय की वाचले पाहिजे. एक खरंय की वराइटी वाचल्यामुळे जरा वेगवेगळे विचार निर्माण होतात. पण एकुणात माझा कल हा ऐतिहासिक, तत्वज्ञान स्वरुपाच्या तथा राजकीय सत्ता आणि त्याविषयी निगडीत घटना यावर का कुणास ठावुक जरा आहे खरा . बघू कस जमतय ते. लोकसत्ता मध्ये दर शनिवारी गिरिश कुबेर यांच पुस्तक परिक्षण येतं ते पण इंटरेस्टिंग असतं
गजानन भास्कर मेहेंदळेंचे श्री राजा शिवचत्रपति हे पुस्तक म्हणजे शिवकालीन माहीतीचा सागर आहे . हजारो पाने अभ्यास करुन लिहायची म्हणजे हेट्स ओफ़.
लिहिताना जरा विस्कळित पणा आल्याचं जाणवतय. पण लिहिण्याची सवय मोडायला नको.
तसही समर्थानी सांगितले आहेच. दिसामाजी काहितरी लिहावे. थोडा बदल करुन "दिसामाजी काहीतरी टाइपावे " :-)
Thursday, October 11, 2012
गुंठामंत्री
स्थळ:- चिंचवडगाव येथील चौक ! इथे वाहतुक कोंडी होउ नये म्हणुन एकेरी वाहतुक केली आहे.मी योग्य त्या दिशेने आणि योग्य त्या बाजुने चाललोय (अर्थात नेहमीप्रमाणे !) चौकात जाम लागलेला दिसतो ! एक स्कोडा नो एन्ट्री तोडुन आत आलेली आहे. त्याचा चालक आणि माझ्यात झालेली चर्चा
(मी लाइट दिला काच खाली केली.त्याच्या गाडीची काच उघडिच होती.त्याचाबरोबर गाडीमधे २ महिला होत्या .मातोश्री आणि भगिनी असाव्यात)
मी:- मित्रा इकडे वन वे आहे , तिकडे जायचे असेल तर गाडी रिव्हर्स घेउन जा
तो- घेत नाही जा
(तो माझ्या शेजारच्याला गाडी पुढे घ्यायला सांगायला लागला .मी माझी गाडी अजुन पुढे नेली आणि शेजारची गाडि पुढे घेण्याचा रस्ता बंद केला.)
तो:- का रे
मी;- काय झाल
तो:- जाउ दे की
मी:- जा की
तो:- मग कशाला रुबाबत गाडी पुढे काढतोयस
मि ;- मी माझ्या रस्त्यावर आहे
तो:- नखरे नको करु:
मी;- बर
तो:- चल निघ आलाय लै शाना
मी:- अरे मी तुला मित्रा म्हणतोय . काही प्रॉब्लेम आहे का
तो:- चल निघ
(पुढील गाडी निघते रस्ता मोकळा होतो . आपला मित्र गाडी फुल्ल रेस करुन निघुन जातो.)
मग मी थोडा विचार करतो आणि काही निष्कर्ष काढतो
१) गाडी त्याने स्वत: च्या कामाइतुन घेतलेली नसावी
२) गाडी चालावण्याचा परवाना ही त्याने पैसे देउन विकत घेतला असावा कारण त्याला नो एन्त्री समजली नाही
३) लहानपणापासुन त्याच्या घरी नियम पाळावेत हे संस्कार झालेले नसावेत
४)आपला मुलगा काय लडवय्या आहे या कौतुकाने बघणारी माते कडुन काय होणार म्हणा
५) सर्वात शेवटी मह्त्वाचे म्हणजे तो गुंठामंत्री होता. कशावरुन ? सोप्पं आहे बोलायला सुरुवात करेपर्यंत सौथ च्या हिरोसारखे दिसणे आणि बोलायला सुरुवात केली मग गाववाला. स्वत;च्या वाडवडिलाना मिलालेल्या जमिनी फ़ुंकुन गाड्या उडवात फ़िरणार्यांकडुन जरा नीट वागण्यची अपेक्षा करणे चुकीचेच आहे
Sunday, October 7, 2012
पुस्तक
दुर्गा भागवतांचे 'व्यासपर्व ' आणि प्रा. शिवाजीराव भोसले यांचं "मुक्ति गाथा महामानवाची" अप्रतिम पुस्तके आहेत.!! व्यासपर्व हे महाभारतावरील भाष्य या प्रकारत मोडतं . पार श्रीकुष्णापासुन ते द्रौपदी चे व्यक्तीरंग अफलातुन शब्द बद्ध केलेले आहेत. त्याना विदुषी का म्हटलं जात असावं याचा थोडा अंदाज येतो .
आणि गाथा हे योगी अरविंदांवरचे चिंतन आहे. शिवाजीरावांचे अरविंदांवरचे जे व्याख्यान आहे त्यापेक्षा पुस्तक वाचणे हा एक चांगला अनुभव आहे. एकुण पुस्तक वाचल्यावर समर्थांचे दुसरे रुप म्हणुन योगी अरविंद डोळ्यासमोर येतात
Sunday, April 3, 2011
अलौकिक हौतात्म्य
आज फाल्गुन वद्य अमावस्या !! मराठी माणसाला आजच्या दिवसाची गंभीरता माहित आहे . हिंदवी साम्रज्याचे निर्माता शिवराय ज्यांचे पिता होत त्या संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी . इ.स.१६८९ च्या अमावस्येला आलमगीर औरंगज़ेबाने संभाजी आणि त्यांच्याबरोबर छंदोगामात्य कलश यांना वढु येथे आपल्या सुडबुद्धीचा परिणाम म्हणुन अत्यंत हाल हाल करुन लौकिकार्थाने या जगातुन संपवले.अर्थात संभाजी राजांच्या बलिदानाचा परिणाम हा एकुणात आलमगिराच्या अपेक्षे उलट झाला. १६८९ ते १७०८ तमाम मराठी सैन्याने मोगलांविरुध्द झुंज दिली आणि मराठी साम्राज्य टिकवलं . एकुणात ती विजिगिषु वृत्ती ही नमनासच पात्र आहे .
अर्थात इतर अनेक गोष्टींसारखे याच्या कारणामध्येही मतभेद आहेत की संभाजी महाराजानी धर्मबदलासाठी नकार दिल्यामुळे त्याना मारलं की केवळ मराठी साम्राज्य खालसा करण्याच्या आणि स्वराज्याची संपत्ती मिळवण्याच्या हेतुने मारले. सध्या "इतिहास" या विषयाची परिस्थितीच अशी झाली आहे की घटना काय सांगितली जात आहे यापेक्षा ती "कोण" सांगत आहे याकडे अधिक लक्ष दिलं जातंय. एक गोष्टं समजुन घेतली पाहिजे कि इतिहासाचा अन्वयार्थ लावताना तत्कालीन सर्व चौकटींचे बंधन हे अभ्यासकानी घालुन घेतलेच पाहिजे अन्यथा वर्तमानातले तात्कालिक फायद्याचे हिशोब इतिहासाच्या खांद्यावर बंदुक ठेवुन चुकवले जाणार असतील तर मग कालचक्र सर्वाना कधी ना कधी तरी संधी उपलब्ध करुन देतेच त्यावेळेला विरोधी विचारधारा ही परत थोपली ज़ाणारच एवढे भान असले तर बरे !!. मर्यादेयं विराजते !!
Saturday, April 2, 2011
एन्ना रास्कला !!!!!! माइंड इट !!!
ता.क. भारताने सामना जिंकला यामगे अजुन एक शक्ति होती जि पुर्ण वेळ वानखेडे स्टेडियम मध्ये सामना पहात होती.... !!!!! खरे खोटे परमेश्वर जाणे !
ति शक्ती म्हणजे ....
एन्ना रास्कला !!!!!! माइंड इट !!! अर्थात रजनिकांत
कलुथै कुटमातावरुम सिंगम सिगलातावरुम !!!!!
means
Donkeys come in group !!!! Lion comes Alone!!!!!!!!
अखेर जिंकलो !!!
अखेर धोनि आणि सहकार्यानी वर्ल्ड कप जिंकला बुवा !
एकुणात उच्च सांघिक कामगिरीबद्दल सगळ्यांचं अभिनंदन !! भारतामध्ये क्रिकेट हा विषय खेळणार्यांपेक्षा तो बघणारे अंमळ जरा जास्तच असावेत.पण क्रिकेट्चा सामना आपली भारतियत्वाची ओळख जरा ठळक करायला मदत करतो हे पुन्हा अधोरेखित झाले . तसेहि देशातील एकुण बाकिची परिस्थिटि पाहता लोकाना मानसिक स्वस्थता लाभणारी बातमी बरेच दिवसातुन मिळाली हे बरे झाले !
Thursday, March 31, 2011
दे घुमा के
काल पाकिस्तानला हरवल्यानंतर जो उत्स्फूर्त प्रतिसाद जनमानसातुन उमटला तो बहुदा २६/११ च्या प्रकारानंतर प्रत्येक जण जो एक सुड घेउ इछित होता त्याचे प्रतिक असावे. मला कल्पना आहे कि या विधानाशी सगळेच सहमत होणारहि नाहित. पण लोकांच्या मताचे विश्लेषण करायचा प्रयत्न केला तर त्याच्या मुळाशी हि भावना असावी असे वाटते. माझी वैयक्तिक भावना तरी ती होती.
तर आता पुढे जाउन शनिवारी भारत श्रीलंका यांच्यात अंतिम सामना आहे. अपेक्षांचे ओझे अर्थातच टिम इंडियावर असेलच. शुभेछ्या देणे आपले काम आहे . बाकी खेळणारे खेळतिलच !!
काहि वाचनिय
बरेच वर्षानंतर परततोय . विचार आहे कि य उपक्रमात तरि थोडिशी नियमिता ठेवावी. बघु कसे जमतंय ते. सध्य मि एक पुस्तक वाचुन संपवलं. डॉ सदनंद मोरे यानि लिहिलेलं "लोक्मान्य ते महात्मा".. अतिशय प्रचंड आवाक्याचा विषय अतिशय संतुलित स्वरुपात आणि तो हि कुठलाहि वाद निर्माण न होउ देता मांडलाय. नावातच स्पष्ट होत त्याप्रमाणे लोकमान्य टिळक ते महात्मा गांधी ह नेतृत्व बदल आणि तत्कालिन परिस्थिती यावरिल भाष्य आहे. बराच मोठ आहे . दुसराही खंड वाचायला आवडेल . बर्याचशा घटना माहिती असलेल्यl असल्या तरिहि भाष्य दृष्टिने बघताना वेगळे वाटते.
Sunday, November 2, 2008
अब तो मैं उनके लिये रोता भी नहीं
अब तो मैं उनके लिये रोता भी नहीं
अब तो मैं उनके लिये रोता भी नहीं
शायद मेरा ही समजना नाकाफी था
जुबां तो बोली उनकी के मैने तुम्हारे बारे मे कभी सोचा ही नही
नैना कुछ अलग हि बयां कर रहे थे जब हम आखिरी बार मिले थे
सिवाय मान जाने के अलावा चारा भी न था कोइ
ना मानना मेरी नजरों मे उनपे गैरभरोसा हो जाता
समझानेकी कोशिश कर रहा हुं खुदको के ये दर्या तुम्हारा नहीं
पर हाय ये दिल कि कश्ति है के तुफ़ां हि पसंद करती है
Sunday, October 7, 2007
रामाला वाटलं नव्हतं..........
रामाला वाटलं नव्हतं आपलीच सावत्र माता आपल्याला वनवासात पाठवील
आपल्या पित्याचा आपल्याच वियोगाने मृत्यु होइल
आपल्यामुळे जानकी आणि लक्ष्मणाला वनवास लाभेल
आणि १४ वर्षे अयोध्येचे सिंहासन खाली राहील
रामाला वाटलं नव्हतं.....
रामाला वाटलं नव्हतं
वनवासात रावण सितेचे अपहरण करिल
तिला सोडवण्यासाठी आपण द्रविड मुलुखात जाउ
उभ्या आर्यावर्तातील सर्व सजीव आपल्या पाठीशी राहतील
आणि रावणाला मारल्यावर विजयादशमी साजरी होइल
रामाला वाटलं नव्हतं.....
रामाला वाटलं नव्हतं
आपल्या जन्मस्थळावरुन वाद होतील
लोक एकमेकांचे गळे कापतील.
आपल्या नावाने यात्रा निघतील
आणि लोक आपल्या नावाने मतं मागतील
रामाला वाटलं नव्हतं.....
रामाला असेही वाटलं नव्हतंकी
आपल्या अस्तित्वावरच कोणि शंका घेइल
आपल्याला कोणि दारुडा म्हणेल
आपल्या नावाचा काही लोकाना कनवाळा
तर काहिना एवढा तिटकारा येइल
रामाला तसे वाटले असते तर.........
त्याने आपल्या जन्मस्थळाचा सातबारा करुन ठेवला असता
मातेची आज्ञा पाळुन वनवासाला गेला नसता
सितेचे अपहरण झाले नसते
तो द्रविड मुलुखात गेला नसता
त्याला हनुमान भेटला नसता
सेतु बांधला गेला नसता
रावण मेला नसता
दसरा साजरा झाला नसता
आणि लोकाना निवडणुकीला मुद्दा मिळाला नसता
फारतर लोकानी त्याला मात्यापित्याचे न ऐकल्याबद्दल मर्यादापुरुषोत्तम म्हटले नसते पण आर्यावर्ताच्या कल्याणासाठी रामाने हे पातक केले असते........
Saturday, April 21, 2007
संवेदना...........
..... आधी पावसाचि भुरभुर बघुन मन हुरहुरु लागयचे............. आता मात्र पावसाचा तिटकारा वाटतोय आधी सकाळी नजर दिवस चांगला जावा म्हणुन भारद्वाजाला शोधायचि.............. हल्ली बुद्धिने भावनेवर मात केलिये.......... आधि झाडाच्या पायथ्याच्या खारीची चाल बघुन मौज वटायची आताशा झाडंच दिसत नाहित चिमणी चिवचिवत नाही इंद्रधनु वेड लावत नाही असे कशामुळे होतय मन म्हातारे झालय? का वैश्विकरणामुळे संवेदना बोथट झालिये? लोकहो सगळ्यांचच असं होतंय का ? याचं उत्तर शोधत शोधत असच विमनस्कपणे एक दिवस भटकलो तेवढ्यात एक पांथस्थ दिसला.... विचारपुस केली त्याची कोण कुठचा म्हणुन.......... डोळेच त्याचे बोलुन गेले अमरत्वाचा वारसा सांगुन............... खिन्नपणाने हसला आणि म्हणाला ,
फ़िरतोय माथी एक शाप घेउन, कोवळ्या जिवांच्या हत्येचा हा परिपाक आहे. संवेदना गोठलेल्या मनाला मिळलेला अभिशाप आहे
मागत फ़िरतोय घडाभर तेल अश्वत्थामा करण्या पापाचे परिमार्जन जागत्या ठेवा संवेदना हाच त्याच्या जिवनाचा आशयघन .........
फ़िरतोय माथी एक शाप घेउन, कोवळ्या जिवांच्या हत्येचा हा परिपाक आहे. संवेदना गोठलेल्या मनाला मिळलेला अभिशाप आहे
मागत फ़िरतोय घडाभर तेल अश्वत्थामा करण्या पापाचे परिमार्जन जागत्या ठेवा संवेदना हाच त्याच्या जिवनाचा आशयघन .........
Saturday, April 14, 2007
.. मन करा रे प्रसन्न
.... रात्री गाडीला किक मारावी , हायवेला फार गर्दी नसावी आणि अशा परिस्थितीत आपली बाइक रस्त्याची एक बाजु पकडुन ५० च्या वेगाने चालवायची यात एक सुख आहे. तसेच पुढे जाउन आपण मग हमरस्ता सोडतो आणि आडवाटेने जायला लागतो. गाडीला धाप लागेल असा एक घाट लागतो. त्या घाटाच्या चढाच्या टोकावर एक शंकराचे मंदीर असते. आपण गाड्या कडेला घेतो. पौर्णीमा येउ घातलेली असते. त्यामुळे चंद्र आणि चांदण्या ताजातवान्या भासतात.
एव्हाना आपण ऑफिसमधील कामाचा ताण , घराच्या वाढणार्या किमती या आणि इतर अशा गोष्टी (ज्यावर विचार करुन आपण फक्त वेळ वाया घालवतो) त्यापासुन जरा बाहेर आलेले असतो,
आता ती जी शांतता असते ती ऐकुन आपल्याला स्वाभाविकपणे समाधी अवस्था प्राप्त करुन घेण्याचा मोह होतो. त्यात काही वावगे आणि अनैसर्गिक ही नाही. बरेच लोकाना असे होते. लोक निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर अंतर्मुख वगैरे होतात. आपण शांतपणे बसलेलो असतो. थोड्या वेळाने वार्याचाही आवाज आपल्याला खुपायला सुरुवात होते.
त्या वातावरणात माणुस स्वत:ला विसरु पाहतो. पण असे निरीक्षण आहे की जसे आपण शांततेकडे प्रवास करतो तसतसे आतला कोलाहल वाढायला सुरुवात होते. तरी त्यातुनही आपण स्वत:ला दामटुन पुढे रेटु बघतो. बराच विचित्र अनुभव असतो हा. मला डोक्यात काही विचार नको आहेत . आणि आतातर विचार पाठ सोडायला तयार नाहियेत. मधेच काही सरपटणारे , किटकांचे आवाज त्यात अजुन भरच टाकतात . अजुन जागे करतात. आपला जो निसर्गाबरोबर हा संवाद चालु असतो आणि त्यामधे येणारे हे जे व्यत्यय सदृश उदभव असतात तेच कदाचित माणसाला बरेचदा समाधी अवस्थेपासुन परावृत्त करत असावेत. आणि मानवी मनातील षड्रिपू ही त्या किटक बिरादरीचा वारसा सांगणारेच वाटतात. त्यावेळेला संत तुकारामानी सांगितलेल्या "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धिचे कारण " ची तीव्रतेने आठवण होते . त्या षड्रिपुंपासुन मुक्त होण्याचा "एड्रेस" देणारे एखादे "सर्च इंजिन" या "डिजिटल" युगात विकसित होइल तर काय बहार येइल अशी एक रम्य कल्पना करत मी नेहमी तो अपेक्षांचा घाट उतरतो
एव्हाना आपण ऑफिसमधील कामाचा ताण , घराच्या वाढणार्या किमती या आणि इतर अशा गोष्टी (ज्यावर विचार करुन आपण फक्त वेळ वाया घालवतो) त्यापासुन जरा बाहेर आलेले असतो,
आता ती जी शांतता असते ती ऐकुन आपल्याला स्वाभाविकपणे समाधी अवस्था प्राप्त करुन घेण्याचा मोह होतो. त्यात काही वावगे आणि अनैसर्गिक ही नाही. बरेच लोकाना असे होते. लोक निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर अंतर्मुख वगैरे होतात. आपण शांतपणे बसलेलो असतो. थोड्या वेळाने वार्याचाही आवाज आपल्याला खुपायला सुरुवात होते.
त्या वातावरणात माणुस स्वत:ला विसरु पाहतो. पण असे निरीक्षण आहे की जसे आपण शांततेकडे प्रवास करतो तसतसे आतला कोलाहल वाढायला सुरुवात होते. तरी त्यातुनही आपण स्वत:ला दामटुन पुढे रेटु बघतो. बराच विचित्र अनुभव असतो हा. मला डोक्यात काही विचार नको आहेत . आणि आतातर विचार पाठ सोडायला तयार नाहियेत. मधेच काही सरपटणारे , किटकांचे आवाज त्यात अजुन भरच टाकतात . अजुन जागे करतात. आपला जो निसर्गाबरोबर हा संवाद चालु असतो आणि त्यामधे येणारे हे जे व्यत्यय सदृश उदभव असतात तेच कदाचित माणसाला बरेचदा समाधी अवस्थेपासुन परावृत्त करत असावेत. आणि मानवी मनातील षड्रिपू ही त्या किटक बिरादरीचा वारसा सांगणारेच वाटतात. त्यावेळेला संत तुकारामानी सांगितलेल्या "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धिचे कारण " ची तीव्रतेने आठवण होते . त्या षड्रिपुंपासुन मुक्त होण्याचा "एड्रेस" देणारे एखादे "सर्च इंजिन" या "डिजिटल" युगात विकसित होइल तर काय बहार येइल अशी एक रम्य कल्पना करत मी नेहमी तो अपेक्षांचा घाट उतरतो
Saturday, March 24, 2007
विं. दां ची कविता
विं. दां. ची हि अप्रतिम कविता
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामिल सर्व तारे
मी चालतो अखंड चालायचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे
डरतात वादळाना जे दास त्या धृवाचे
हे शिड तोडले की अनुकुल सर्व वारे
मग्रुर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे
चुकली दिशा तरी ही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्या रे
आशा तशी निराशा हे खेळ सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामिल सर्व तारे
मी चालतो अखंड चालायचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे
डरतात वादळाना जे दास त्या धृवाचे
हे शिड तोडले की अनुकुल सर्व वारे
मग्रुर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे
चुकली दिशा तरी ही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्या रे
आशा तशी निराशा हे खेळ सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे
Friday, March 23, 2007
परिस्थितीमुळे माणुस कि माणसामुळे......
.......परवा आय. टी. आय. प्रशिक्षणार्थींचा इंटरव्ह्यु घ्यायला सातार्याला गेलो होतो. आम्हाला ०९.३० ला पोहोचण्यास सांगितले होते. वाटेत " विरंगुळ्या"च्या थालिपिठाचा आस्वाद घेउन आम्ही वेळेवर पोहोचलो. ( इथे आवर्जुन नमुद करावेसे वाटते कि खंबाटकी घाट संपल्यानंतर विरंगुळा म्हणून होटेल आहे . खाद्यपंढरीच्या वारकर्यानी तेथील थालपिठाचा आवर्जुन स्वाद घ्यावा) आम्ही पोहोचल्यावर एकंदरीत उपस्थिती कमी होतीच आणि आजुबाजुच्या गावातुन येणारी मुले थोडी उशिरा येणार असे कळल्यामुळे पाय मोकळे करायाला बाहेर पडलो. आमच्या गप्पा चालु होत्या. तेवढ्यात एक मध्यमवयीन सद्ग़ृहथ तिथे आले. नमस्कार चमत्कार झाल्यवर त्यांच्याकडून असे कळले की ते कोल्हापुरजवळच्या एक खेड्यातुन आले आहेत. आणि त्यांचा मुलगा इंटर्व्ह्युला येणार होता. ते एस. टी . मधुन निवृत्त झाले होते आणी शिलाइकाम वगैरे करुन घर चालवत होते " साहेब तेवढे आपल्या पोराचे बघा हं"त्याना सांगतले की जर कंपनीच्या अटीप्रमाणे मुलगा पात्र ठरला तर पुढे नोकरी मिळायला काहीच अडाचण येणार नाही.पण हे म्हणताना मला मध्यंतरी " बाप" असा जो इमेल आला होता त्यातिल " पोराच्या नोकरीसाठी शब्द टाकणारा बाप" आटहवला.मुलाखती ना सुरुवात झाली. माझ्यापुढ्यात मिसरुडही न फुटलेला एक कोवळा पोरगा येउन बसला. अर्थात मि ही ५-७ वर्षांच प्रदीर्घ अनुभव जमेला घेउन मुलाखत घ्यायला गेलो होतो. पण काही माणसे प्रथमदर्शीच अगदी आज्ञाधारक आणि होतकरु आणि काही पहिल्यांदाच डांबिस वाटतात त्यातल्या पहिल्या प्रकारतल हे पोरगे वाटले.त्याला एकंदरीत घरातल्या परिस्थितीविषयी जाणिव दिसली. त्याला त्याच्या विषायातील आवश्यक ते ज्ञान होते.त्यामुळे त्याला निवड्ण्यात काही अडचण आली नाही. पुढचा उमेदवार हा शेतमजुर पार्श्वभुमी असलेल्या कुटुंबातील होता.त्याला १-२ वर्षाचा अनुभवहि होता. पण बुवाने ३-४ प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर सरळ संगितले " साहेब जर परमनंट करणार असाल तरच मि येन्णार आहे . त्याच्या या एकंदरीतच बर्तावाने त्याने एक प्रकारे स्वत:चा तोटाच करुन घेतला . जो मुलगा खरोखरीच गरज असताना मुलाखतीच्यावेळी असे बोलु शकतो त पुढे त्रासदायक ठरेल हे दिसतच होते.. थोड्या वेळानंतर आलेला उमेदवार हा "साखर पट्ट्यातील " होता. घरचा १५ एकर उस होता. मुलाला एकंदरीत विषयाबद्दल माहिती यथातथाच होती.यथातथा हे ही जरा मी जास्तच सांगितले.बोलता बोलता असे कळले की महाशयाना राजकारणात रस होता आणि त्याने मोठी मोठी नावे अगदी छाती फुगवुन सांगितली. आम्हाला त्या नावांबद्द्ल समस्या नव्हती. पण आपण ज्या कामासाठी आलोय त्याबद्दलची बेफ़िकिरी " साखरे" च्या प्रभावाने आलेली दिसली. अर्थात त्याबद्द्ल तो किती भिज्ञ /अनभिज्ञ होता हा ही प्रश्नच होता म्हणा. अर्थात मुलाना आम्ही नंअतर कळवतो असे सांगत होतो त्यामुळे त्यांची नाराजी वगैरे काही लगेच दिसली नाही. पुढचा उमेदवारही "साखरपट्ट्यातील " हे बघितल्यावर त्याच्याशी बोलणे हे अधिकच सावधपणे चालु झाले. पण दुसरा धक्का इथे बसला. घरची बागायती असुन ही आवड म्हणून या क्षेत्रातील जुजबी शिक्षण घेणे आणि थोड्या पगारावरही नोकरीची तयारी दाखवणे जरा बुचकळ्यात टाकणारे होते. आणी ही पोरे अगदिच लहान आणि या क्षेत्रात नवी असल्याने नाटके वगैरे करत नाहियेत हे दिसत होते. दिवसाअखेरीस मुलाखती संपल्यनंतर आमचा हाच चर्चेचा विषय झाला होता. की "परिस्थितीमुळे माणुस का माणसामुळे परिस्थिती.?" आणि आपण ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्यानी आपल्याला काही फसवले नसेल असे स्वत:ला बजावत परंतु डोक्यात निवृत्त वडिलानी टाकलेल्या शब्दाबरहुकुम असणारा, गरज असतानही उर्मटपणाने बोलणारा, आणि साखरपट्ट्यातिल दोन वेगवेगळ्या उसांचा "उतारा" वेगळा असु शकतो याचा प्रत्यय देणारा असे अनुभव घेउन परतीची वाट धरली
Thursday, March 22, 2007
II हरी ओम तत्सत II
.........मी खुप विचार केला . आणि हे पटले की लिहिणे आणि ते ही इतराना वाचणेबल असे काही लिहिणे हे येर्या गबाळ्याचे काम नोहे . नाही, म्हणजे मला लिहीता येत नाही अशातला भाग नाही. घरच्यांच्या आणी सर्वशक्तिमान अशा त्या परमेश्वराच्या कृपेने शाळेत जाण्याचे भाग्य आम्हाला आणि आम्हाला शिकवण्याचे भाग्य शाळेला लाभले . पण( ह्या "पणा"नेच आतापर्यंत घात केलाय) आपण काही लिहावे अशी भावनाही आतापर्यंत कधी निर्माण झाली. नाही. असो .....(आमच्याकडे "असो " हा शब्द -- आतापर्यंत वायफळ चर्च खुप झाली . आता(तरी) मुद्याचे बोला अशा अर्थाने वापरला जातो.)तरीही संधी मिळालिये तर तत्वज्ञ लोकांसरखे थोडे फार मुक्त चिंतन करुन घेतो.
Subscribe to:
Posts (Atom)