Tuesday, October 23, 2012

भ्रष्टाचार , टी.व्ही ,आपण आणि जैसे थे !!!



मला दुरचित्रवाहिनी काढण्याची इच्छा निर्माण झाली आहे. काहिही जबाबदारी नाही आणि प्रचंड उपद्रवी मुल्य ! अगदी ग्राम्य भाषेत सांगायचं जर झालं तर शेंबुड पुसता न येणारी पोरं पोरीं रिपोर्टर म्हणुन घ्यायची स्वत:च्या ५-७ वर्षाच्या प्रचंड अनुभवावर घटनांचे विश्लेषण करायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गळ्याच्या शिरा ताणुन फुटेस्तोवर बोलायचं !! किती सोप्पं आहे. शेवटी कसं आहे ना, तथाकथित नालायक भ्रष्टाचारी वगैरे राजकारण्याना शिव्या द्यायच्या वगैरे ठिक आहे. जोपर्यंत राजकारणी लोक अनेक लोकांची उदरनिर्वाहाची सोय करतात (कितीही नाकारले तरी हे खर आहे ) आणि जोपर्यंत प्रॉव्हिडंट फंडाची चिंता करण्यात ज्यांचं आयुष्य जातं ते पोटभरु रिपोर्टर त्याला समांतर असा पर्याय देत नाहीत तोपर्यंत हे असेच चालेल . किंबहुना मला तर हल्ली त्यात काहीही गैर वाटेनासे झालंय. स्वत:मध्ये काही करायची धमक नाही आणी जो माणुस काही हातपाय हलवतोय त्याला अडच्णि करायच्या . मला ख्रिस्तची ति गोष्ट आठवते ज्याम्ध्ये एका पापी स्त्रीला शिक्षा द्यायची असते आणि मग तो लोकाना आवाहन करतो कि ज्यानी पाप केलेले नाही त्यानिच शिक्षा द्यावी . कोणिच पुढे येत नाही. भ्रष्टाचाराचेही तसेच आहे ! भ्रष्टाचार म्हणजे केवळ पैसा खाणे नव्हे . भ्रष्ट असा आचार जो सर्वानी कधी ना कधी कळत वा नकळत केलेलाच असतो . शेवटी राजा कालस्य कारणम असे असले तरी राजा हा आपल्यातलाच असतो. आणि ते काही लोकंच खराब आहेत हे विचार आपल्या सर्वांची दांभिकता आहे. आपणही कधी ना कधी सिग्नल तोडलेला असतो,१० ग्रेम का होइना आपण खोटे बोललेलो असतो. बिचारे राजकारणी सॉफ्ट टार्गेट आहेत. खरं हे आहे की आपण पण चोर आहोत .तेव्हा गाइज कूल डाउन !! जैसे थे !

No comments: