Sunday, October 21, 2012

दिसामाजी काहीतरी टाइपावे


मला पु ल देशपांडे यांचं एक वाक्य फ़ार आवडतं "मला भावलेलं एक गुज सांगतो. आयुष्यात पोटापाण्यासाठी ती कला अवश्य जोपासा  पण त्याच बरोबर संगीत ,शिल्पकला, चित्रकला ,गायन यापैकी ही कुठल्यातरी कलेशी  ही मैत्री करा. पहिली कला जगावयास मदत करेल आणि दुसरी कला का जगायच ते सांगेल .

वाचन ही सुध्दा कला आहे अशी म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे का असा प्रश्न मला उगाच आपला विचारवंतासारखा पडतो आणि मग मी जाउन एखादे पुस्तक विकत घेतो. संग्रहामधल्या एकूण पुस्तकांमध्ये न वाचलेल्या /अर्धा वाचलेल्या पुस्तकांची संख्या हि संपुर्ण वाचलेल्या पुस्तकांच्या संख्येपेक्षा जास्त असावी :-)

पण हल्ली मी ठरवलय की वाचले पाहिजे. एक खरंय की वराइटी वाचल्यामुळे जरा वेगवेगळे विचार निर्माण होतात. पण एकुणात माझा कल हा ऐतिहासिक, तत्वज्ञान स्वरुपाच्या  तथा राजकीय सत्ता आणि त्याविषयी निगडीत घटना यावर का कुणास ठावुक जरा आहे खरा . बघू कस जमतय ते. लोकसत्ता  मध्ये दर शनिवारी गिरिश कुबेर यांच पुस्तक  परिक्षण  येतं ते पण इंटरेस्टिंग असतं
गजानन भास्कर मेहेंदळेंचे श्री राजा शिवचत्रपति हे पुस्तक म्हणजे शिवकालीन माहीतीचा सागर आहे . हजारो पाने अभ्यास करुन लिहायची म्हणजे हेट्स ओफ़.
लिहिताना जरा विस्कळित पणा आल्याचं जाणवतय. पण लिहिण्याची सवय मोडायला नको.
तसही समर्थानी सांगितले आहेच. दिसामाजी काहितरी लिहावे. थोडा बदल करुन "दिसामाजी काहीतरी टाइपावे " :-)

No comments: