Tuesday, October 23, 2012

भ्रष्टाचार , टी.व्ही ,आपण आणि जैसे थे !!!



मला दुरचित्रवाहिनी काढण्याची इच्छा निर्माण झाली आहे. काहिही जबाबदारी नाही आणि प्रचंड उपद्रवी मुल्य ! अगदी ग्राम्य भाषेत सांगायचं जर झालं तर शेंबुड पुसता न येणारी पोरं पोरीं रिपोर्टर म्हणुन घ्यायची स्वत:च्या ५-७ वर्षाच्या प्रचंड अनुभवावर घटनांचे विश्लेषण करायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गळ्याच्या शिरा ताणुन फुटेस्तोवर बोलायचं !! किती सोप्पं आहे. शेवटी कसं आहे ना, तथाकथित नालायक भ्रष्टाचारी वगैरे राजकारण्याना शिव्या द्यायच्या वगैरे ठिक आहे. जोपर्यंत राजकारणी लोक अनेक लोकांची उदरनिर्वाहाची सोय करतात (कितीही नाकारले तरी हे खर आहे ) आणि जोपर्यंत प्रॉव्हिडंट फंडाची चिंता करण्यात ज्यांचं आयुष्य जातं ते पोटभरु रिपोर्टर त्याला समांतर असा पर्याय देत नाहीत तोपर्यंत हे असेच चालेल . किंबहुना मला तर हल्ली त्यात काहीही गैर वाटेनासे झालंय. स्वत:मध्ये काही करायची धमक नाही आणी जो माणुस काही हातपाय हलवतोय त्याला अडच्णि करायच्या . मला ख्रिस्तची ति गोष्ट आठवते ज्याम्ध्ये एका पापी स्त्रीला शिक्षा द्यायची असते आणि मग तो लोकाना आवाहन करतो कि ज्यानी पाप केलेले नाही त्यानिच शिक्षा द्यावी . कोणिच पुढे येत नाही. भ्रष्टाचाराचेही तसेच आहे ! भ्रष्टाचार म्हणजे केवळ पैसा खाणे नव्हे . भ्रष्ट असा आचार जो सर्वानी कधी ना कधी कळत वा नकळत केलेलाच असतो . शेवटी राजा कालस्य कारणम असे असले तरी राजा हा आपल्यातलाच असतो. आणि ते काही लोकंच खराब आहेत हे विचार आपल्या सर्वांची दांभिकता आहे. आपणही कधी ना कधी सिग्नल तोडलेला असतो,१० ग्रेम का होइना आपण खोटे बोललेलो असतो. बिचारे राजकारणी सॉफ्ट टार्गेट आहेत. खरं हे आहे की आपण पण चोर आहोत .तेव्हा गाइज कूल डाउन !! जैसे थे !

Sunday, October 21, 2012

दिसामाजी काहीतरी टाइपावे


मला पु ल देशपांडे यांचं एक वाक्य फ़ार आवडतं "मला भावलेलं एक गुज सांगतो. आयुष्यात पोटापाण्यासाठी ती कला अवश्य जोपासा  पण त्याच बरोबर संगीत ,शिल्पकला, चित्रकला ,गायन यापैकी ही कुठल्यातरी कलेशी  ही मैत्री करा. पहिली कला जगावयास मदत करेल आणि दुसरी कला का जगायच ते सांगेल .

वाचन ही सुध्दा कला आहे अशी म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे का असा प्रश्न मला उगाच आपला विचारवंतासारखा पडतो आणि मग मी जाउन एखादे पुस्तक विकत घेतो. संग्रहामधल्या एकूण पुस्तकांमध्ये न वाचलेल्या /अर्धा वाचलेल्या पुस्तकांची संख्या हि संपुर्ण वाचलेल्या पुस्तकांच्या संख्येपेक्षा जास्त असावी :-)

पण हल्ली मी ठरवलय की वाचले पाहिजे. एक खरंय की वराइटी वाचल्यामुळे जरा वेगवेगळे विचार निर्माण होतात. पण एकुणात माझा कल हा ऐतिहासिक, तत्वज्ञान स्वरुपाच्या  तथा राजकीय सत्ता आणि त्याविषयी निगडीत घटना यावर का कुणास ठावुक जरा आहे खरा . बघू कस जमतय ते. लोकसत्ता  मध्ये दर शनिवारी गिरिश कुबेर यांच पुस्तक  परिक्षण  येतं ते पण इंटरेस्टिंग असतं
गजानन भास्कर मेहेंदळेंचे श्री राजा शिवचत्रपति हे पुस्तक म्हणजे शिवकालीन माहीतीचा सागर आहे . हजारो पाने अभ्यास करुन लिहायची म्हणजे हेट्स ओफ़.
लिहिताना जरा विस्कळित पणा आल्याचं जाणवतय. पण लिहिण्याची सवय मोडायला नको.
तसही समर्थानी सांगितले आहेच. दिसामाजी काहितरी लिहावे. थोडा बदल करुन "दिसामाजी काहीतरी टाइपावे " :-)

Thursday, October 11, 2012

गुंठामंत्री



स्थळ:- चिंचवडगाव येथील चौक ! इथे वाहतुक कोंडी होउ नये म्हणुन एकेरी वाहतुक केली आहे.मी योग्य त्या दिशेने आणि योग्य त्या बाजुने चाललोय (अर्थात नेहमीप्रमाणे !) चौकात जाम लागलेला दिसतो ! एक स्कोडा नो एन्ट्री तोडुन आत आलेली आहे. त्याचा चालक आणि माझ्यात झालेली चर्चा
(मी लाइट दिला काच खाली केली.त्याच्या गाडीची काच उघडिच होती.त्याचाबरोबर गाडीमधे २ महिला होत्या .मातोश्री आणि भगिनी असाव्यात)
मी:- मित्रा इकडे वन वे आहे , तिकडे जायचे असेल तर गाडी रिव्हर्स घेउन जा
तो- घेत नाही जा
(तो माझ्या शेजारच्याला गाडी पुढे घ्यायला सांगायला लागला .मी माझी गाडी अजुन पुढे नेली आणि शेजारची गाडि पुढे घेण्याचा रस्ता बंद केला.)
तो:- का रे
मी;- काय झाल
तो:- जाउ दे की
मी:- जा की
तो:- मग कशाला रुबाबत गाडी पुढे काढतोयस
मि ;- मी माझ्या रस्त्यावर आहे
तो:- नखरे नको करु:
मी;- बर
तो:- चल निघ आलाय लै शाना
मी:- अरे मी तुला मित्रा म्हणतोय . काही प्रॉब्लेम आहे का
तो:- चल निघ
(पुढील गाडी निघते रस्ता मोकळा होतो . आपला मित्र गाडी फुल्ल रेस करुन निघुन जातो.)
मग मी थोडा विचार करतो आणि काही निष्कर्ष काढतो
१) गाडी त्याने स्वत: च्या कामाइतुन घेतलेली नसावी
२) गाडी चालावण्याचा परवाना ही त्याने पैसे देउन विकत घेतला असावा कारण त्याला नो एन्त्री समजली नाही
३) लहानपणापासुन त्याच्या घरी नियम पाळावेत हे संस्कार झालेले नसावेत
४)आपला मुलगा काय लडवय्या आहे या कौतुकाने बघणारी माते कडुन काय होणार म्हणा
५) सर्वात शेवटी मह्त्वाचे म्हणजे तो गुंठामंत्री होता. कशावरुन ? सोप्पं आहे बोलायला सुरुवात करेपर्यंत सौथ च्या हिरोसारखे दिसणे आणि बोलायला सुरुवात केली मग गाववाला. स्वत;च्या वाडवडिलाना मिलालेल्या जमिनी फ़ुंकुन गाड्या उडवात फ़िरणार्‍यांकडुन जरा नीट वागण्यची अपेक्षा करणे चुकीचेच आहे

Sunday, October 7, 2012

पुस्तक


दुर्गा भागवतांचे 'व्यासपर्व ' आणि प्रा. शिवाजीराव भोसले यांचं "मुक्ति गाथा महामानवाची" अप्रतिम पुस्तके आहेत.!!  व्यासपर्व हे महाभारतावरील भाष्य या प्रकारत मोडतं . पार  श्रीकुष्णापासुन ते द्रौपदी चे व्यक्तीरंग अफलातुन शब्द बद्ध केलेले आहेत. त्याना विदुषी का म्हटलं जात असावं याचा थोडा अंदाज येतो .
 आणि गाथा हे योगी अरविंदांवरचे   चिंतन आहे. शिवाजीरावांचे अरविंदांवरचे जे व्याख्यान आहे त्यापेक्षा पुस्तक वाचणे हा एक चांगला अनुभव आहे. एकुण पुस्तक वाचल्यावर समर्थांचे दुसरे रुप म्हणुन योगी अरविंद डोळ्यासमोर येतात

Sunday, April 3, 2011

अलौकिक हौतात्म्य

आज फाल्गुन वद्य अमावस्या !! मराठी माणसाला आजच्या दिवसाची गंभीरता माहित आहे . हिंदवी साम्रज्याचे निर्माता शिवराय ज्यांचे पिता होत त्या संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी . इ.स.१६८९ च्या अमावस्येला आलमगीर औरंगज़ेबाने संभाजी आणि त्यांच्याबरोबर छंदोगामात्य कलश यांना वढु येथे आपल्या सुडबुद्धीचा परिणाम म्हणुन अत्यंत हाल हाल करुन लौकिकार्थाने या जगातुन संपवले.अर्थात संभाजी राजांच्या बलिदानाचा परिणाम हा एकुणात आलमगिराच्या अपेक्षे उलट झाला. १६८९ ते १७०८ तमाम मराठी सैन्याने मोगलांविरुध्द झुंज दिली आणि मराठी साम्राज्य टिकवलं . एकुणात ती विजिगिषु वृत्ती ही नमनासच पात्र आहे .

अर्थात इतर अनेक गोष्टींसारखे याच्या कारणामध्येही मतभेद आहेत की संभाजी महाराजानी धर्मबदलासाठी नकार दिल्यामुळे त्याना मारलं की केवळ मराठी साम्राज्य खालसा करण्याच्या आणि स्वराज्याची संपत्ती मिळवण्याच्या हेतुने मारले. सध्या "इतिहास" या विषयाची परिस्थितीच अशी झाली आहे की घटना काय सांगितली जात आहे यापेक्षा ती "कोण" सांगत आहे याकडे अधिक लक्ष दिलं जातंय. एक गोष्टं समजुन घेतली पाहिजे कि इतिहासाचा अन्वयार्थ लावताना तत्कालीन सर्व चौकटींचे बंधन हे अभ्यासकानी घालुन घेतलेच पाहिजे अन्यथा वर्तमानातले तात्कालिक फायद्याचे हिशोब इतिहासाच्या खांद्यावर बंदुक ठेवुन चुकवले जाणार असतील तर मग कालचक्र सर्वाना कधी ना कधी तरी संधी उपलब्ध करुन देतेच त्यावेळेला विरोधी विचारधारा ही परत थोपली ज़ाणारच एवढे भान असले तर बरे !!. मर्यादेयं विराजते !!

Saturday, April 2, 2011

एन्ना रास्कला !!!!!! माइंड इट !!!

ता.क. भारताने सामना जिंकला यामगे अजुन एक शक्ति होती जि पुर्ण वेळ वानखेडे स्टेडियम मध्ये सामना पहात होती.... !!!!! खरे खोटे परमेश्वर जाणे !


ति शक्ती म्हणजे ....


एन्ना रास्कला !!!!!! माइंड इट !!! अर्थात रजनिकांत


कलुथै कुटमातावरुम सिंगम सिगलातावरुम !!!!!
means
Donkeys come in group !!!! Lion comes Alone!!!!!!!!

अखेर जिंकलो !!!

अखेर धोनि आणि सहकार्‍यानी वर्ल्ड कप जिंकला बुवा !
एकुणात उच्च सांघिक कामगिरीबद्दल सगळ्यांचं अभिनंदन !! भारतामध्ये क्रिकेट हा विषय खेळणार्‍यांपेक्षा तो बघणारे अंमळ जरा जास्तच असावेत.पण क्रिकेट्चा सामना आपली भारतियत्वाची ओळख जरा ठळक करायला मदत करतो हे पुन्हा अधोरेखित झाले . तसेहि देशातील एकुण बाकिची परिस्थिटि पाहता लोकाना मानसिक स्वस्थता लाभणारी बातमी बरेच दिवसातुन मिळाली हे बरे झाले !