Sunday, October 7, 2007

रामाला वाटलं नव्हतं..........


रामाला वाटलं नव्हतं आपलीच सावत्र माता आपल्याला वनवासात पाठवील
आपल्या पित्याचा आपल्याच वियोगाने मृत्यु होइल
आपल्यामुळे जानकी आणि लक्ष्मणाला वनवास लाभेल
आणि १४ वर्षे अयोध्येचे सिंहासन खाली राहील
रामाला वाटलं नव्हतं.....

रामाला वाटलं नव्हतं
वनवासात रावण सितेचे अपहरण करिल
तिला सोडवण्यासाठी आपण द्रविड मुलुखात जाउ
उभ्या आर्यावर्तातील सर्व सजीव आपल्या पाठीशी राहतील
आणि रावणाला मारल्यावर विजयादशमी साजरी होइल
रामाला वाटलं नव्हतं.....

रामाला वाटलं नव्हतं
आपल्या जन्मस्थळावरुन वाद होतील
लोक एकमेकांचे गळे कापतील.
आपल्या नावाने यात्रा निघतील
आणि लोक आपल्या नावाने मतं मागतील
रामाला वाटलं नव्हतं.....

रामाला असेही वाटलं नव्हतंकी
आपल्या अस्तित्वावरच कोणि शंका घेइल
आपल्याला कोणि दारुडा म्हणेल
आपल्या नावाचा काही लोकाना कनवाळा
तर काहिना एवढा तिटकारा येइल

रामाला तसे वाटले असते तर.........
त्याने आपल्या जन्मस्थळाचा सातबारा करुन ठेवला असता
मातेची आज्ञा पाळुन वनवासाला गेला नसता
सितेचे अपहरण झाले नसते
तो द्रविड मुलुखात गेला नसता
त्याला हनुमान भेटला नसता
सेतु बांधला गेला नसता
रावण मेला नसता
दसरा साजरा झाला नसता
आणि लोकाना निवडणुकीला मुद्दा मिळाला नसता

फारतर लोकानी त्याला मात्यापित्याचे न ऐकल्याबद्दल
मर्यादापुरुषोत्तम म्हटले नसते पण आर्यावर्ताच्या कल्याणासाठी रामाने हे पातक केले असते........