Friday, March 23, 2007

परिस्थितीमुळे माणुस कि माणसामुळे......

.......रवा आय. टी. आय. प्रशिक्षणार्थींचा इंटरव्ह्यु घ्यायला सातार्‍याला गेलो होतो. आम्हाला ०९.३० ला पोहोचण्यास सांगितले होते. वाटेत " विरंगुळ्या"च्या थालिपिठाचा आस्वाद घेउन आम्ही वेळेवर पोहोचलो. ( इथे आवर्जुन नमुद करावेसे वाटते कि खंबाटकी घाट संपल्यानंतर विरंगुळा म्हणून होटेल आहे . खाद्यपंढरीच्या वारकर्‍यानी तेथील थालपिठाचा आवर्जुन स्वाद घ्यावा) आम्ही पोहोचल्यावर एकंदरीत उपस्थिती कमी होतीच आणि आजुबाजुच्या गावातुन येणारी मुले थोडी उशिरा येणार असे कळल्यामुळे पाय मोकळे करायाला बाहेर पडलो. आमच्या गप्पा चालु होत्या. तेवढ्यात एक मध्यमवयीन सद्ग़ृहथ तिथे आले. नमस्कार चमत्कार झाल्यवर त्यांच्याकडून असे कळले की ते कोल्हापुरजवळच्या एक खेड्यातुन आले आहेत. आणि त्यांचा मुलगा इंटर्व्ह्युला येणार होता. ते एस. टी . मधुन निवृत्त झाले होते आणी शिलाइकाम वगैरे करुन घर चालवत होते " साहेब तेवढे आपल्या पोराचे बघा हं"त्याना सांगतले की जर कंपनीच्या अटीप्रमाणे मुलगा पात्र ठरला तर पुढे नोकरी मिळायला काहीच अडाचण येणार नाही.पण हे म्हणताना मला मध्यंतरी " बाप" असा जो इमेल आला होता त्यातिल " पोराच्या नोकरीसाठी शब्द टाकणारा बाप" आटहवला.मुलाखती ना सुरुवात झाली. माझ्यापुढ्यात मिसरुडही न फुटलेला एक कोवळा पोरगा येउन बसला. अर्थात मि ही ५-७ वर्षांच प्रदीर्घ अनुभव जमेला घेउन मुलाखत घ्यायला गेलो होतो. पण काही माणसे प्रथमदर्शीच अगदी आज्ञाधारक आणि होतकरु आणि काही पहिल्यांदाच डांबिस वाटतात त्यातल्या पहिल्या प्रकारतल हे पोरगे वाटले.त्याला एकंदरीत घरातल्या परिस्थितीविषयी जाणिव दिसली. त्याला त्याच्या विषायातील आवश्यक ते ज्ञान होते.त्यामुळे त्याला निवड्ण्यात काही अडचण आली नाही. पुढचा उमेदवार हा शेतमजुर पार्श्वभुमी असलेल्या कुटुंबातील होता.त्याला १-२ वर्षाचा अनुभवहि होता. पण बुवाने ३-४ प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर सरळ संगितले " साहेब जर परमनंट करणार असाल तरच मि येन्णार आहे . त्याच्या या एकंदरीतच बर्तावाने त्याने एक प्रकारे स्वत:चा तोटाच करुन घेतला . जो मुलगा खरोखरीच गरज असताना मुलाखतीच्यावेळी असे बोलु शकतो त पुढे त्रासदायक ठरेल हे दिसतच होते.. थोड्या वेळानंतर आलेला उमेदवार हा "साखर पट्ट्यातील " होता. घरचा १५ एकर उस होता. मुलाला एकंदरीत विषयाबद्दल माहिती यथातथाच होती.यथातथा हे ही जरा मी जास्तच सांगितले.बोलता बोलता असे कळले की महाशयाना राजकारणात रस होता आणि त्याने मोठी मोठी नावे अगदी छाती फुगवुन सांगितली. आम्हाला त्या नावांबद्द्ल समस्या नव्हती. पण आपण ज्या कामासाठी आलोय त्याबद्दलची बेफ़िकिरी " साखरे" च्या प्रभावाने आलेली दिसली. अर्थात त्याबद्द्ल तो किती भिज्ञ /अनभिज्ञ होता हा ही प्रश्नच होता म्हणा. अर्थात मुलाना आम्ही नंअतर कळवतो असे सांगत होतो त्यामुळे त्यांची नाराजी वगैरे काही लगेच दिसली नाही. पुढचा उमेदवारही "साखरपट्ट्यातील " हे बघितल्यावर त्याच्याशी बोलणे हे अधिकच सावधपणे चालु झाले. पण दुसरा धक्का इथे बसला. घरची बागायती असुन ही आवड म्हणून या क्षेत्रातील जुजबी शिक्षण घेणे आणि थोड्या पगारावरही नोकरीची तयारी दाखवणे जरा बुचकळ्यात टाकणारे होते. आणी ही पोरे अगदिच लहान आणि या क्षेत्रात नवी असल्याने नाटके वगैरे करत नाहियेत हे दिसत होते. दिवसाअखेरीस मुलाखती संपल्यनंतर आमचा हाच चर्चेचा विषय झाला होता. की "परिस्थितीमुळे माणुस का माणसामुळे परिस्थिती.?" आणि आपण ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्यानी आपल्याला काही फसवले नसेल असे स्वत:ला बजावत परंतु डोक्यात निवृत्त वडिलानी टाकलेल्या शब्दाबरहुकुम असणारा, गरज असतानही उर्मटपणाने बोलणारा, आणि साखरपट्ट्यातिल दोन वेगवेगळ्या उसांचा "उतारा" वेगळा असु शकतो याचा प्रत्यय देणारा असे अनुभव घेउन परतीची वाट धरली

3 comments:

HAREKRISHNAJI said...

विरंगुळ्याला जायला हवे. लेख मस्त आहे

Unknown said...

best lihitos rey.......

Yogesh Sawant said...

दादा, अनुभव कथन सुंदर केलंय तुम्ही.

"शेतकरी" किंवा "राजकारण" हा व्यवसाय असेल तर मुलांचं लग्न सहसा जमत नाही. हे हि एक कारण आहे ज्यामुळे काही मुलांना नोकरी हवी असते. चपराश्याची असली तरी चालेल, पण मल्टि नॅशनल कंपनीत नोकरी असेल तर लग्न लवकर जमवता येते. लग्न जमवताना हुद्दा खोटा सांगून वेळ मारून नेता येते.