.... का कुणास ठाउक मला ' बद्रिकेदार ' हे नाव फारच प्रभावित करते. त्या नावामधे एक भारदस्त सौंदर्य आहे असे मला वाटते. " नावात काय आहे " असे जरी शेक्सपिअर म्हणून गेला असला आणि त्या वाक्याखाली स्वत:चे नाव लिहुन गेला असला तरी नाव माणसाला अस्तित्वाच्या जाणिवेबरोबरच बरेच काही देते असे मला वाटते.... हा ब्लॉग त्या सर्वशक्तीमान अशा " बद्रिकेदारार्पणमस्तु"
Sunday, October 7, 2007
रामाला वाटलं नव्हतं..........
रामाला वाटलं नव्हतं आपलीच सावत्र माता आपल्याला वनवासात पाठवील
आपल्या पित्याचा आपल्याच वियोगाने मृत्यु होइल
आपल्यामुळे जानकी आणि लक्ष्मणाला वनवास लाभेल
आणि १४ वर्षे अयोध्येचे सिंहासन खाली राहील
रामाला वाटलं नव्हतं.....
रामाला वाटलं नव्हतं
वनवासात रावण सितेचे अपहरण करिल
तिला सोडवण्यासाठी आपण द्रविड मुलुखात जाउ
उभ्या आर्यावर्तातील सर्व सजीव आपल्या पाठीशी राहतील
आणि रावणाला मारल्यावर विजयादशमी साजरी होइल
रामाला वाटलं नव्हतं.....
रामाला वाटलं नव्हतं
आपल्या जन्मस्थळावरुन वाद होतील
लोक एकमेकांचे गळे कापतील.
आपल्या नावाने यात्रा निघतील
आणि लोक आपल्या नावाने मतं मागतील
रामाला वाटलं नव्हतं.....
रामाला असेही वाटलं नव्हतंकी
आपल्या अस्तित्वावरच कोणि शंका घेइल
आपल्याला कोणि दारुडा म्हणेल
आपल्या नावाचा काही लोकाना कनवाळा
तर काहिना एवढा तिटकारा येइल
रामाला तसे वाटले असते तर.........
त्याने आपल्या जन्मस्थळाचा सातबारा करुन ठेवला असता
मातेची आज्ञा पाळुन वनवासाला गेला नसता
सितेचे अपहरण झाले नसते
तो द्रविड मुलुखात गेला नसता
त्याला हनुमान भेटला नसता
सेतु बांधला गेला नसता
रावण मेला नसता
दसरा साजरा झाला नसता
आणि लोकाना निवडणुकीला मुद्दा मिळाला नसता
फारतर लोकानी त्याला मात्यापित्याचे न ऐकल्याबद्दल मर्यादापुरुषोत्तम म्हटले नसते पण आर्यावर्ताच्या कल्याणासाठी रामाने हे पातक केले असते........
Saturday, April 21, 2007
संवेदना...........
..... आधी पावसाचि भुरभुर बघुन मन हुरहुरु लागयचे............. आता मात्र पावसाचा तिटकारा वाटतोय आधी सकाळी नजर दिवस चांगला जावा म्हणुन भारद्वाजाला शोधायचि.............. हल्ली बुद्धिने भावनेवर मात केलिये.......... आधि झाडाच्या पायथ्याच्या खारीची चाल बघुन मौज वटायची आताशा झाडंच दिसत नाहित चिमणी चिवचिवत नाही इंद्रधनु वेड लावत नाही असे कशामुळे होतय मन म्हातारे झालय? का वैश्विकरणामुळे संवेदना बोथट झालिये? लोकहो सगळ्यांचच असं होतंय का ? याचं उत्तर शोधत शोधत असच विमनस्कपणे एक दिवस भटकलो तेवढ्यात एक पांथस्थ दिसला.... विचारपुस केली त्याची कोण कुठचा म्हणुन.......... डोळेच त्याचे बोलुन गेले अमरत्वाचा वारसा सांगुन............... खिन्नपणाने हसला आणि म्हणाला ,
फ़िरतोय माथी एक शाप घेउन, कोवळ्या जिवांच्या हत्येचा हा परिपाक आहे. संवेदना गोठलेल्या मनाला मिळलेला अभिशाप आहे
मागत फ़िरतोय घडाभर तेल अश्वत्थामा करण्या पापाचे परिमार्जन जागत्या ठेवा संवेदना हाच त्याच्या जिवनाचा आशयघन .........
फ़िरतोय माथी एक शाप घेउन, कोवळ्या जिवांच्या हत्येचा हा परिपाक आहे. संवेदना गोठलेल्या मनाला मिळलेला अभिशाप आहे
मागत फ़िरतोय घडाभर तेल अश्वत्थामा करण्या पापाचे परिमार्जन जागत्या ठेवा संवेदना हाच त्याच्या जिवनाचा आशयघन .........
Saturday, April 14, 2007
.. मन करा रे प्रसन्न
.... रात्री गाडीला किक मारावी , हायवेला फार गर्दी नसावी आणि अशा परिस्थितीत आपली बाइक रस्त्याची एक बाजु पकडुन ५० च्या वेगाने चालवायची यात एक सुख आहे. तसेच पुढे जाउन आपण मग हमरस्ता सोडतो आणि आडवाटेने जायला लागतो. गाडीला धाप लागेल असा एक घाट लागतो. त्या घाटाच्या चढाच्या टोकावर एक शंकराचे मंदीर असते. आपण गाड्या कडेला घेतो. पौर्णीमा येउ घातलेली असते. त्यामुळे चंद्र आणि चांदण्या ताजातवान्या भासतात.
एव्हाना आपण ऑफिसमधील कामाचा ताण , घराच्या वाढणार्या किमती या आणि इतर अशा गोष्टी (ज्यावर विचार करुन आपण फक्त वेळ वाया घालवतो) त्यापासुन जरा बाहेर आलेले असतो,
आता ती जी शांतता असते ती ऐकुन आपल्याला स्वाभाविकपणे समाधी अवस्था प्राप्त करुन घेण्याचा मोह होतो. त्यात काही वावगे आणि अनैसर्गिक ही नाही. बरेच लोकाना असे होते. लोक निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर अंतर्मुख वगैरे होतात. आपण शांतपणे बसलेलो असतो. थोड्या वेळाने वार्याचाही आवाज आपल्याला खुपायला सुरुवात होते.
त्या वातावरणात माणुस स्वत:ला विसरु पाहतो. पण असे निरीक्षण आहे की जसे आपण शांततेकडे प्रवास करतो तसतसे आतला कोलाहल वाढायला सुरुवात होते. तरी त्यातुनही आपण स्वत:ला दामटुन पुढे रेटु बघतो. बराच विचित्र अनुभव असतो हा. मला डोक्यात काही विचार नको आहेत . आणि आतातर विचार पाठ सोडायला तयार नाहियेत. मधेच काही सरपटणारे , किटकांचे आवाज त्यात अजुन भरच टाकतात . अजुन जागे करतात. आपला जो निसर्गाबरोबर हा संवाद चालु असतो आणि त्यामधे येणारे हे जे व्यत्यय सदृश उदभव असतात तेच कदाचित माणसाला बरेचदा समाधी अवस्थेपासुन परावृत्त करत असावेत. आणि मानवी मनातील षड्रिपू ही त्या किटक बिरादरीचा वारसा सांगणारेच वाटतात. त्यावेळेला संत तुकारामानी सांगितलेल्या "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धिचे कारण " ची तीव्रतेने आठवण होते . त्या षड्रिपुंपासुन मुक्त होण्याचा "एड्रेस" देणारे एखादे "सर्च इंजिन" या "डिजिटल" युगात विकसित होइल तर काय बहार येइल अशी एक रम्य कल्पना करत मी नेहमी तो अपेक्षांचा घाट उतरतो
एव्हाना आपण ऑफिसमधील कामाचा ताण , घराच्या वाढणार्या किमती या आणि इतर अशा गोष्टी (ज्यावर विचार करुन आपण फक्त वेळ वाया घालवतो) त्यापासुन जरा बाहेर आलेले असतो,
आता ती जी शांतता असते ती ऐकुन आपल्याला स्वाभाविकपणे समाधी अवस्था प्राप्त करुन घेण्याचा मोह होतो. त्यात काही वावगे आणि अनैसर्गिक ही नाही. बरेच लोकाना असे होते. लोक निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर अंतर्मुख वगैरे होतात. आपण शांतपणे बसलेलो असतो. थोड्या वेळाने वार्याचाही आवाज आपल्याला खुपायला सुरुवात होते.
त्या वातावरणात माणुस स्वत:ला विसरु पाहतो. पण असे निरीक्षण आहे की जसे आपण शांततेकडे प्रवास करतो तसतसे आतला कोलाहल वाढायला सुरुवात होते. तरी त्यातुनही आपण स्वत:ला दामटुन पुढे रेटु बघतो. बराच विचित्र अनुभव असतो हा. मला डोक्यात काही विचार नको आहेत . आणि आतातर विचार पाठ सोडायला तयार नाहियेत. मधेच काही सरपटणारे , किटकांचे आवाज त्यात अजुन भरच टाकतात . अजुन जागे करतात. आपला जो निसर्गाबरोबर हा संवाद चालु असतो आणि त्यामधे येणारे हे जे व्यत्यय सदृश उदभव असतात तेच कदाचित माणसाला बरेचदा समाधी अवस्थेपासुन परावृत्त करत असावेत. आणि मानवी मनातील षड्रिपू ही त्या किटक बिरादरीचा वारसा सांगणारेच वाटतात. त्यावेळेला संत तुकारामानी सांगितलेल्या "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धिचे कारण " ची तीव्रतेने आठवण होते . त्या षड्रिपुंपासुन मुक्त होण्याचा "एड्रेस" देणारे एखादे "सर्च इंजिन" या "डिजिटल" युगात विकसित होइल तर काय बहार येइल अशी एक रम्य कल्पना करत मी नेहमी तो अपेक्षांचा घाट उतरतो
Saturday, March 24, 2007
विं. दां ची कविता
विं. दां. ची हि अप्रतिम कविता
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामिल सर्व तारे
मी चालतो अखंड चालायचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे
डरतात वादळाना जे दास त्या धृवाचे
हे शिड तोडले की अनुकुल सर्व वारे
मग्रुर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे
चुकली दिशा तरी ही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्या रे
आशा तशी निराशा हे खेळ सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामिल सर्व तारे
मी चालतो अखंड चालायचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे
डरतात वादळाना जे दास त्या धृवाचे
हे शिड तोडले की अनुकुल सर्व वारे
मग्रुर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे
चुकली दिशा तरी ही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्या रे
आशा तशी निराशा हे खेळ सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे
Friday, March 23, 2007
परिस्थितीमुळे माणुस कि माणसामुळे......
.......परवा आय. टी. आय. प्रशिक्षणार्थींचा इंटरव्ह्यु घ्यायला सातार्याला गेलो होतो. आम्हाला ०९.३० ला पोहोचण्यास सांगितले होते. वाटेत " विरंगुळ्या"च्या थालिपिठाचा आस्वाद घेउन आम्ही वेळेवर पोहोचलो. ( इथे आवर्जुन नमुद करावेसे वाटते कि खंबाटकी घाट संपल्यानंतर विरंगुळा म्हणून होटेल आहे . खाद्यपंढरीच्या वारकर्यानी तेथील थालपिठाचा आवर्जुन स्वाद घ्यावा) आम्ही पोहोचल्यावर एकंदरीत उपस्थिती कमी होतीच आणि आजुबाजुच्या गावातुन येणारी मुले थोडी उशिरा येणार असे कळल्यामुळे पाय मोकळे करायाला बाहेर पडलो. आमच्या गप्पा चालु होत्या. तेवढ्यात एक मध्यमवयीन सद्ग़ृहथ तिथे आले. नमस्कार चमत्कार झाल्यवर त्यांच्याकडून असे कळले की ते कोल्हापुरजवळच्या एक खेड्यातुन आले आहेत. आणि त्यांचा मुलगा इंटर्व्ह्युला येणार होता. ते एस. टी . मधुन निवृत्त झाले होते आणी शिलाइकाम वगैरे करुन घर चालवत होते " साहेब तेवढे आपल्या पोराचे बघा हं"त्याना सांगतले की जर कंपनीच्या अटीप्रमाणे मुलगा पात्र ठरला तर पुढे नोकरी मिळायला काहीच अडाचण येणार नाही.पण हे म्हणताना मला मध्यंतरी " बाप" असा जो इमेल आला होता त्यातिल " पोराच्या नोकरीसाठी शब्द टाकणारा बाप" आटहवला.मुलाखती ना सुरुवात झाली. माझ्यापुढ्यात मिसरुडही न फुटलेला एक कोवळा पोरगा येउन बसला. अर्थात मि ही ५-७ वर्षांच प्रदीर्घ अनुभव जमेला घेउन मुलाखत घ्यायला गेलो होतो. पण काही माणसे प्रथमदर्शीच अगदी आज्ञाधारक आणि होतकरु आणि काही पहिल्यांदाच डांबिस वाटतात त्यातल्या पहिल्या प्रकारतल हे पोरगे वाटले.त्याला एकंदरीत घरातल्या परिस्थितीविषयी जाणिव दिसली. त्याला त्याच्या विषायातील आवश्यक ते ज्ञान होते.त्यामुळे त्याला निवड्ण्यात काही अडचण आली नाही. पुढचा उमेदवार हा शेतमजुर पार्श्वभुमी असलेल्या कुटुंबातील होता.त्याला १-२ वर्षाचा अनुभवहि होता. पण बुवाने ३-४ प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर सरळ संगितले " साहेब जर परमनंट करणार असाल तरच मि येन्णार आहे . त्याच्या या एकंदरीतच बर्तावाने त्याने एक प्रकारे स्वत:चा तोटाच करुन घेतला . जो मुलगा खरोखरीच गरज असताना मुलाखतीच्यावेळी असे बोलु शकतो त पुढे त्रासदायक ठरेल हे दिसतच होते.. थोड्या वेळानंतर आलेला उमेदवार हा "साखर पट्ट्यातील " होता. घरचा १५ एकर उस होता. मुलाला एकंदरीत विषयाबद्दल माहिती यथातथाच होती.यथातथा हे ही जरा मी जास्तच सांगितले.बोलता बोलता असे कळले की महाशयाना राजकारणात रस होता आणि त्याने मोठी मोठी नावे अगदी छाती फुगवुन सांगितली. आम्हाला त्या नावांबद्द्ल समस्या नव्हती. पण आपण ज्या कामासाठी आलोय त्याबद्दलची बेफ़िकिरी " साखरे" च्या प्रभावाने आलेली दिसली. अर्थात त्याबद्द्ल तो किती भिज्ञ /अनभिज्ञ होता हा ही प्रश्नच होता म्हणा. अर्थात मुलाना आम्ही नंअतर कळवतो असे सांगत होतो त्यामुळे त्यांची नाराजी वगैरे काही लगेच दिसली नाही. पुढचा उमेदवारही "साखरपट्ट्यातील " हे बघितल्यावर त्याच्याशी बोलणे हे अधिकच सावधपणे चालु झाले. पण दुसरा धक्का इथे बसला. घरची बागायती असुन ही आवड म्हणून या क्षेत्रातील जुजबी शिक्षण घेणे आणि थोड्या पगारावरही नोकरीची तयारी दाखवणे जरा बुचकळ्यात टाकणारे होते. आणी ही पोरे अगदिच लहान आणि या क्षेत्रात नवी असल्याने नाटके वगैरे करत नाहियेत हे दिसत होते. दिवसाअखेरीस मुलाखती संपल्यनंतर आमचा हाच चर्चेचा विषय झाला होता. की "परिस्थितीमुळे माणुस का माणसामुळे परिस्थिती.?" आणि आपण ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्यानी आपल्याला काही फसवले नसेल असे स्वत:ला बजावत परंतु डोक्यात निवृत्त वडिलानी टाकलेल्या शब्दाबरहुकुम असणारा, गरज असतानही उर्मटपणाने बोलणारा, आणि साखरपट्ट्यातिल दोन वेगवेगळ्या उसांचा "उतारा" वेगळा असु शकतो याचा प्रत्यय देणारा असे अनुभव घेउन परतीची वाट धरली
Thursday, March 22, 2007
II हरी ओम तत्सत II
.........मी खुप विचार केला . आणि हे पटले की लिहिणे आणि ते ही इतराना वाचणेबल असे काही लिहिणे हे येर्या गबाळ्याचे काम नोहे . नाही, म्हणजे मला लिहीता येत नाही अशातला भाग नाही. घरच्यांच्या आणी सर्वशक्तिमान अशा त्या परमेश्वराच्या कृपेने शाळेत जाण्याचे भाग्य आम्हाला आणि आम्हाला शिकवण्याचे भाग्य शाळेला लाभले . पण( ह्या "पणा"नेच आतापर्यंत घात केलाय) आपण काही लिहावे अशी भावनाही आतापर्यंत कधी निर्माण झाली. नाही. असो .....(आमच्याकडे "असो " हा शब्द -- आतापर्यंत वायफळ चर्च खुप झाली . आता(तरी) मुद्याचे बोला अशा अर्थाने वापरला जातो.)तरीही संधी मिळालिये तर तत्वज्ञ लोकांसरखे थोडे फार मुक्त चिंतन करुन घेतो.
Subscribe to:
Posts (Atom)