Sunday, April 3, 2011

अलौकिक हौतात्म्य

आज फाल्गुन वद्य अमावस्या !! मराठी माणसाला आजच्या दिवसाची गंभीरता माहित आहे . हिंदवी साम्रज्याचे निर्माता शिवराय ज्यांचे पिता होत त्या संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी . इ.स.१६८९ च्या अमावस्येला आलमगीर औरंगज़ेबाने संभाजी आणि त्यांच्याबरोबर छंदोगामात्य कलश यांना वढु येथे आपल्या सुडबुद्धीचा परिणाम म्हणुन अत्यंत हाल हाल करुन लौकिकार्थाने या जगातुन संपवले.अर्थात संभाजी राजांच्या बलिदानाचा परिणाम हा एकुणात आलमगिराच्या अपेक्षे उलट झाला. १६८९ ते १७०८ तमाम मराठी सैन्याने मोगलांविरुध्द झुंज दिली आणि मराठी साम्राज्य टिकवलं . एकुणात ती विजिगिषु वृत्ती ही नमनासच पात्र आहे .

अर्थात इतर अनेक गोष्टींसारखे याच्या कारणामध्येही मतभेद आहेत की संभाजी महाराजानी धर्मबदलासाठी नकार दिल्यामुळे त्याना मारलं की केवळ मराठी साम्राज्य खालसा करण्याच्या आणि स्वराज्याची संपत्ती मिळवण्याच्या हेतुने मारले. सध्या "इतिहास" या विषयाची परिस्थितीच अशी झाली आहे की घटना काय सांगितली जात आहे यापेक्षा ती "कोण" सांगत आहे याकडे अधिक लक्ष दिलं जातंय. एक गोष्टं समजुन घेतली पाहिजे कि इतिहासाचा अन्वयार्थ लावताना तत्कालीन सर्व चौकटींचे बंधन हे अभ्यासकानी घालुन घेतलेच पाहिजे अन्यथा वर्तमानातले तात्कालिक फायद्याचे हिशोब इतिहासाच्या खांद्यावर बंदुक ठेवुन चुकवले जाणार असतील तर मग कालचक्र सर्वाना कधी ना कधी तरी संधी उपलब्ध करुन देतेच त्यावेळेला विरोधी विचारधारा ही परत थोपली ज़ाणारच एवढे भान असले तर बरे !!. मर्यादेयं विराजते !!

Saturday, April 2, 2011

एन्ना रास्कला !!!!!! माइंड इट !!!

ता.क. भारताने सामना जिंकला यामगे अजुन एक शक्ति होती जि पुर्ण वेळ वानखेडे स्टेडियम मध्ये सामना पहात होती.... !!!!! खरे खोटे परमेश्वर जाणे !


ति शक्ती म्हणजे ....


एन्ना रास्कला !!!!!! माइंड इट !!! अर्थात रजनिकांत


कलुथै कुटमातावरुम सिंगम सिगलातावरुम !!!!!
means
Donkeys come in group !!!! Lion comes Alone!!!!!!!!

अखेर जिंकलो !!!

अखेर धोनि आणि सहकार्‍यानी वर्ल्ड कप जिंकला बुवा !
एकुणात उच्च सांघिक कामगिरीबद्दल सगळ्यांचं अभिनंदन !! भारतामध्ये क्रिकेट हा विषय खेळणार्‍यांपेक्षा तो बघणारे अंमळ जरा जास्तच असावेत.पण क्रिकेट्चा सामना आपली भारतियत्वाची ओळख जरा ठळक करायला मदत करतो हे पुन्हा अधोरेखित झाले . तसेहि देशातील एकुण बाकिची परिस्थिटि पाहता लोकाना मानसिक स्वस्थता लाभणारी बातमी बरेच दिवसातुन मिळाली हे बरे झाले !

Thursday, March 31, 2011

दे घुमा के

काल पाकिस्तानला हरवल्यानंतर जो उत्स्फूर्त प्रतिसाद जनमानसातुन उमटला तो बहुदा २६/११ च्या प्रकारानंतर प्रत्येक जण जो एक सुड घेउ इछित होता त्याचे प्रतिक असावे. मला कल्पना आहे कि या विधानाशी सगळेच सहमत होणारहि नाहित. पण लोकांच्या मताचे विश्लेषण करायचा प्रयत्न केला तर त्याच्या मुळाशी हि भावना असावी असे वाटते. माझी वैयक्तिक भावना तरी ती होती.

तर आता पुढे जाउन शनिवारी भारत श्रीलंका यांच्यात अंतिम सामना आहे. अपेक्षांचे ओझे अर्थातच टिम इंडियावर असेलच. शुभेछ्या देणे आपले काम आहे . बाकी खेळणारे खेळतिलच !!

काहि वाचनिय

बरेच वर्षानंतर परततोय . विचार आहे कि य उपक्रमात तरि थोडिशी नियमिता ठेवावी. बघु कसे जमतंय ते. सध्य मि एक पुस्तक वाचुन संपवलं. डॉ सदनंद मोरे यानि लिहिलेलं "लोक्मान्य ते महात्मा".. अतिशय प्रचंड आवाक्याचा विषय अतिशय संतुलित स्वरुपात आणि तो हि कुठलाहि वाद निर्माण न होउ देता मांडलाय. नावातच स्पष्ट होत त्याप्रमाणे लोकमान्य टिळक ते महात्मा गांधी ह नेतृत्व बदल आणि तत्कालिन परिस्थिती यावरिल भाष्य आहे. बराच मोठ आहे . दुसराही खंड वाचायला आवडेल . बर्‍याचशा घटना माहिती असलेल्यl असल्या तरिहि भाष्य दृष्टिने बघताना वेगळे वाटते.

Sunday, November 2, 2008

अब तो मैं उनके लिये रोता भी नहीं

अब तो मैं उनके लिये रोता भी नहीं

अब तो मैं उनके लिये रोता भी नहीं

शायद मेरा ही समजना नाकाफी था

जुबां तो बोली उनकी के मैने तुम्हारे बारे मे कभी सोचा ही नही

नैना कुछ अलग हि बयां कर रहे थे जब हम आखिरी बार मिले थे

सिवाय मान जाने के अलावा चारा भी न था कोइ

ना मानना मेरी नजरों मे उनपे गैरभरोसा हो जाता

समझानेकी कोशिश कर रहा हुं खुदको के ये दर्या तुम्हारा नहीं

पर हाय ये दिल कि कश्ति है के तुफ़ां हि पसंद करती है

Sunday, October 7, 2007

रामाला वाटलं नव्हतं..........


रामाला वाटलं नव्हतं आपलीच सावत्र माता आपल्याला वनवासात पाठवील
आपल्या पित्याचा आपल्याच वियोगाने मृत्यु होइल
आपल्यामुळे जानकी आणि लक्ष्मणाला वनवास लाभेल
आणि १४ वर्षे अयोध्येचे सिंहासन खाली राहील
रामाला वाटलं नव्हतं.....

रामाला वाटलं नव्हतं
वनवासात रावण सितेचे अपहरण करिल
तिला सोडवण्यासाठी आपण द्रविड मुलुखात जाउ
उभ्या आर्यावर्तातील सर्व सजीव आपल्या पाठीशी राहतील
आणि रावणाला मारल्यावर विजयादशमी साजरी होइल
रामाला वाटलं नव्हतं.....

रामाला वाटलं नव्हतं
आपल्या जन्मस्थळावरुन वाद होतील
लोक एकमेकांचे गळे कापतील.
आपल्या नावाने यात्रा निघतील
आणि लोक आपल्या नावाने मतं मागतील
रामाला वाटलं नव्हतं.....

रामाला असेही वाटलं नव्हतंकी
आपल्या अस्तित्वावरच कोणि शंका घेइल
आपल्याला कोणि दारुडा म्हणेल
आपल्या नावाचा काही लोकाना कनवाळा
तर काहिना एवढा तिटकारा येइल

रामाला तसे वाटले असते तर.........
त्याने आपल्या जन्मस्थळाचा सातबारा करुन ठेवला असता
मातेची आज्ञा पाळुन वनवासाला गेला नसता
सितेचे अपहरण झाले नसते
तो द्रविड मुलुखात गेला नसता
त्याला हनुमान भेटला नसता
सेतु बांधला गेला नसता
रावण मेला नसता
दसरा साजरा झाला नसता
आणि लोकाना निवडणुकीला मुद्दा मिळाला नसता

फारतर लोकानी त्याला मात्यापित्याचे न ऐकल्याबद्दल
मर्यादापुरुषोत्तम म्हटले नसते पण आर्यावर्ताच्या कल्याणासाठी रामाने हे पातक केले असते........